पुन्हा एकदा दाभोलकरांच्या विचारांचाच खून?

डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दाभोलकरांच्या विचारांचाच खून केलाय. 

Updated: Jul 7, 2014, 02:45 PM IST
पुन्हा एकदा दाभोलकरांच्या विचारांचाच खून? title=

पुणे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दाभोलकरांच्या विचारांचाच खून केलाय. 

दाभोलकरांचे मारेकरी शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी चक्क एका भोंदूबाबाची मदत घेतल्याचा दावा आऊटलूक नियतकालिकाने आपल्या एका लेखात केलाय. 

गेल्यावर्षी दाभोलकरांची २० ऑगस्टला हत्या झाली होती. मात्र या गुन्ह्याची उकल झालेली नाही. 

अखेर हत्येचे धागेदोरे मिळवण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दौंडमधल्या मनिष ठाकूर नावाच्या मांत्रिकाला पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावलं होतं. 

या मांत्रिकाच्या माध्यमातून दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधला गेल्याचा दावा या आऊटलूकने केलाय. अर्थात यातून काहीच निष्पन्न झालं नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.