पुणे : भाजप हा गुंडांचा पक्ष बनला आहे. पुणे सुसंस्कृत शहर आहे, अशा शहरात भाजपला गुंड का लागतात?, असा सवाल काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सावल उपस्थित केला. भाजपने जणू जाहिरात देऊन गुंड गोळा केलेत. हे सरकार आज आहे, उद्या नाही. २१ तारखेनंतर काय होईल सांगता येणार नाही, असे ते म्हणालेत.
अधिकाऱ्यांनी निरपेक्षपणे काम करायला पाहीजे. भाजप सरकार गढुळाचं पाणी आहे. भाजपने पारदर्शकता सांगू नये, मी युतीचा मुख्यमंत्री होतो. मला कोण कसा आहे माहीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र तोडायला निघालेत, आम्ही १०५ हुतात्मे देऊन हा महाराष्ट्र मिळवलाय, आहे असे राणे म्हणालेत.
युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची जुगलबंदी सुरु आहे. त्यातून केवळ मनोरंजन सुरु आहे. उद्धव एकमेकावर आरोप करतात, हे फक्त राजकारण आहे. त्यांची औकाद आम्हाला माहिती आहे. आज एकमेकांवर बोलतात उद्या एकत्र येतात. भाजपला गुंड म्हणणारे राज्यात, केंद्रात त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत, अशी शिवसेनेवर बोचरी टीका केली.
राणे यांनी संजय काकडे यांच्यावर टिका केली. पुण्यातील काकडेचा विचाराशी काय संबंध, त्याने टेंडर, रस्ते याचा विचार करावा. गुंडगीरीची भाषा करून सत्तेचा गैरवापर तो करतोय, अशी टीका राणेंनी केली.