नागपूरमध्ये व्यापारी संघटनेने साजरी केली फुलांची होळी

 सगळीकडेचं होळीचं वातावरण आहे. नागपूरच्या खामलामधील व्यापारी संघटनेच्या वतीनं खास अशी फुलांची होळी साजरी करण्यात आली. होळीचा सन म्हणजे रंगाची उधळण. अशात इकोफ्रेंडली आणि पाण्याची बचत करण्याचा संदेश देत नागपुरातही फुलांची होळी साजरी करण्यात आली.

Updated: Mar 13, 2017, 07:57 AM IST
नागपूरमध्ये व्यापारी संघटनेने साजरी केली फुलांची होळी title=

नागपूर : सगळीकडेचं होळीचं वातावरण आहे. नागपूरच्या खामलामधील व्यापारी संघटनेच्या वतीनं खास अशी फुलांची होळी साजरी करण्यात आली. होळीचा सन म्हणजे रंगाची उधळण. अशात इकोफ्रेंडली आणि पाण्याची बचत करण्याचा संदेश देत नागपुरातही फुलांची होळी साजरी करण्यात आली.

एकमेंकावर फुलांची आणि नैसर्गिक रंगाची उधळण करीत या व्यापा-यांनी होळीचा आनंद लुटला. बाजारपेठेत मिळणारे रंग हे केमिकलयुक्त असल्यानं शरीराला हानिकारक ठरतात तसंच पाण्याचा होणारा अपव्ययही अशा कोरड्या होळीमुळे वाचेल हा संदेश देत फुलांची होळी साजरी करण्यात आली.