सीसीटीव्ही: हॉटेल मालकाला पोलिसांची अमानुष मारहाण

नागपूरमधील वर्धा रोडवरील एका हॉटेल मालकाला पोलिसांनी रविवारी रात्री अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीची ही घटना सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत घडली. 

Updated: Jun 17, 2015, 05:09 PM IST
सीसीटीव्ही: हॉटेल मालकाला पोलिसांची अमानुष मारहाण title=

नागपूर: नागपूरमधील वर्धा रोडवरील एका हॉटेल मालकाला पोलिसांनी रविवारी रात्री अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीची ही घटना सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत घडली. 

पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रात्री हॉटेलमध्ये आलेल्या पोलीस निरीक्षक ए. बी. पाटील आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी, हॉटेलमधील ग्राहकाला दारू पिण्याकरता जागा दिल्याचा आरोप करत हॉटेल मालकाला मारहाण केली. 

याआधी नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका घटनेत पोलिसांनी निष्कारण चकोले बंधूंना बेदम मारहाण केलेल्या प्रकरणाचा पोलीस उपायुक्त अविनाश कुमार तपास करत असतानाच ही घटना घडल्यानं 
नागपुरात गुन्हेगारी थांबवण्याचे सोडून पोलीस आता सर्व सामान्यांना टार्गेट करीत असल्याचे चित्र निर्माण झालंय.

पाहा व्हिडिओ: 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.