नागपूर: नागपुरातल्या उमरेडमध्ये एका गावगुंडाची हत्या करण्यात आलीय. एकाच कुटुंबातल्या आठ जणांनी ही हत्या केलीय. शालिक जाधव असं या हत्या करण्यात आलेल्या गुंडाचं नाव आहे.
उमेरड तालुक्यातल्या जुनोनी गावात ही घटना घडलीय. राठोड कुटुंबीय आणि जाधव कुटुंबीयांचे जुनं वैमनस्य होतं. त्यावरुन दोघांमध्ये खटके उडत असतं. दोन्ही कुटुंबीयांत दोन दिवसांपूर्वी मारामारीची घटना घडली होती. या घटनेनंतर राठोड कुटुंबीयांनी नियोजन करत शालिक जाधवची हत्या केलीय.
याप्रकरणी पोलिसांनी ८ आरोपींना अटक केलीय. शालिक जाधव हा गावगुंड होता. त्याच्यावर ९ गंभीर गुन्हे दाखल होते. नुकताच सहा महिन्यांपूर्वी तो शिक्षा भोगून परतला होता.
दरम्यान, नागपुरमध्ये एखाद्या गुंडाची किंवा आरोपीची हत्या होण्याची ही पहिलीच घटना नाहीय तर याआधीही अशाच प्रकारच्या घटना नागपुरात घडल्यात.
१३ ऑगस्ट २००४मध्ये दगडी इमारतीतील न्यायालयाच्या आवारात कुख्यात गुंड अक्कू यादव याची संतप्त जमावानं हत्या केली. तर १० ऑक्टोबर २०१०मध्ये सीताबर्डी परिसरात मुलींची छेड काढणाऱ्या इक्बाल शेख या गुंडाची जमावानं दगडानं ठेचून हत्या केली होती.
गेल्याच वर्षी २२ जानेवारी २०१४मध्ये मोहशीन रेड्डी याच्या घरात घसून जमावानं हत्या केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.