मुंबई-लातूर एक्स्प्रेस वाद, भाजप खासदारावर बाका प्रसंग

मुंबई-लातूर एक्स्प्रेसचा कर्नाटकातील बिदरपर्यंतच्या विस्तार रद्द होणार नसल्याचे समजल्यानंतर लातूरमधील वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे. त्याचा प्रत्यय बिदरचे भाजप खासदार भगवंत खुब्बा यांना आला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 9, 2017, 10:16 AM IST
मुंबई-लातूर एक्स्प्रेस वाद, भाजप खासदारावर बाका प्रसंग title=

लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेसचा कर्नाटकातील बिदरपर्यंतच्या विस्तार रद्द होणार नसल्याचे समजल्यानंतर लातूरमधील वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे. त्याचा प्रत्यय बिदरचे भाजप खासदार भगवंत खुब्बा यांना आला. 

लातूरमध्ये येऊन पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या खासदार पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांच्या भडिमारामुळे उत्तरं न देताच निघून गेले. त्यानंतर लातूर एक्सप्रेस रेल्वे बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला खासदार भगवंत खुब्बा यांना जावे लागले. 

कार्यकर्ते प्रचंड घोषणाबाजी करत आक्रमक झाले होते. त्यामुळे बिदरच्या खासदारांना पोलीस संरक्षणात विश्रामगृहात बसावे लागले.

दरम्यान, मुंबई-लातूर एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतलाय. या एक्स्प्रेसचं विस्तारीकरण होणारच असल्याचे रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केले आहे.