'मेक इन इंडिया'चं पहिलं यश, मराठमोळ्या अमोलची गगन भरारी

मेक इन इंडिया सप्ताहात भारतीय बनावटीचे पहिले विमान सादर करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव या मराठी तरुणाची वाटचाल आता प्रत्यक्ष विमाननिर्मितीच्या दिशेने सुरू झाली आहे.

Updated: Aug 26, 2016, 01:59 PM IST
'मेक इन इंडिया'चं पहिलं यश, मराठमोळ्या अमोलची गगन भरारी  title=

मुंबई : मेक इन इंडिया सप्ताहात भारतीय बनावटीचे पहिले विमान सादर करणाऱ्या कॅप्टन अमोल यादव या मराठी तरुणाची वाटचाल आता प्रत्यक्ष विमाननिर्मितीच्या दिशेने सुरू झाली आहे. चारकोप इथे इमारतीच्या गच्चीवर बनवलेले पहिलं विमान मेक इन इंडिया सप्ताहात सादर करण्यात आले. मात्र त्यानंतर जागा नसल्यामुळे अमोल यादव यांनी हे विमान मंदिराच्या आवारात ठेवले होते. 

या सगळ्या बाबतीत झी मीडियाने दाखवलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी अमोल यादव यांना विमान निर्मितीसाठी पालघर इथे जागा देऊ केली आहे. भारतीय बनावटीचे पहिले विमान डिसेंबर 2017 पर्यंत उड्डाण करेल अशा पद्धतीने आता अमोल यादव यांनी काम सुरू केले आहे.

पहिलं भारतीय विमान रनवेवर