खासदार नाना पटोले यांच्यावर न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार

भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांची प्रकृती खालावल्याने नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 29, 2017, 07:23 PM IST
खासदार नाना पटोले यांच्यावर न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार title=

नागपूर : भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांची प्रकृती खालावल्याने नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

एका कार्यक्रमा दरम्यान प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानं पटोले यांना आधी साकोलीच्या नंतर भंडारा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सध्या पटोले यांच्यावर न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत,  पुढील 24 तास त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जाणार आहे. पटोले हे सध्या शुद्धीवर असून बोलत असल्याची माहिती देण्यात आलीय.

पटोले यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे ईसीजी करण्यात आलं होतं. मात्र त्यात काही बदल जाणवल्याने डॉक्टरांनी दक्षता म्हणून त्यांना 24 तास रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं आमदार परिणय फुके यांनी म्हटलं आहे.