डोंबिवली : एक दिवसाच्या मुलीला प्लॅटफॉर्मवर एक आई सोडून गेल्याची घटना घडली आहे, मात्र या मुलीच्या आईची ओळख एका नर्सकडून समजली आहे.
प्लॅटफॉर्मवर सोडून दिलेल्या या मुलीला मेडिकलसाठी जेव्हा पोलीस डोंबिवलीच्या शास्त्री नगर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तेव्हा नर्सनी या नवजात अभ्रक मुलीला ओळखलं.
नर्सनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीला सुप्रिया शेट्टी या महिलेने शुक्रवारी जन्म दिली, पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या महिलेला कोपर भागातून शोधून काढलं.
एवढंच नाही, डोंबिवली जीआरपी पोलिसांनी कोपर स्टेशनवरील सीसीटीव्हीचं फुटेज जेव्हा तपासलं, तेव्हा दोन महिला या मुलीला कोपर स्थानकात सोडून गेल्या, हे स्पष्ट दिसत होतं. या प्रकरणी सुप्रिया शेट्टीसह तिच्या आईलाही अटक करण्यात आली आहे. हे कृत्य तीने नेमकं का केलं, याचा शोध पोलीस शोध घेत आहेत.