पुणे : पुण्याच्या वारजे माळवाडीमधल्या गोकूळनगर परिसरात एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. घरात शौचालय नसल्याने पीडित मुलगी लहान बहिणीसोबत बाहेर शौचाला गेली होती, त्याचवेळी अज्ञाताने मुलीला झुडूपात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
घरी आल्यावर या मुलीने सर्वप्रकार आईला सांगितला असता घटना उघड झाली. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. पीडित मुलीवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.