पालघर: पालघर जवळीक तांदूळ वाडी इथल्या साईबाबा मंदिरातील दानपेटीवर एका चोरानं डल्ला मारला. रात्रीच्या सुमारास या चोरानं मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटी उचलूनच पोबारा केला.
मात्र चोरीचा हा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. गंमत म्हणजे या चोरानं चोरी करताना दोनदा साईबाबांचं दर्शन घेतलं. ही दान पेटी जवळील एका जंगलात फोडलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
पाहा हा व्हिडिओ-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.