आता राज्यावरच नाही तर देशावर आलंय 'पांढरं संकट'!

दुधाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एकीकडं दुधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन, दुसरीकडं उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला मिळणारा कमी भाव... तर तिसरीकडं देशात पडून असलेली हजारो टन दूध पावडर... नेमकं काय आहे हे पांढरं संकट..? 

Updated: May 15, 2015, 10:59 PM IST
आता राज्यावरच नाही तर देशावर आलंय 'पांढरं संकट'! title=

कोल्हापूर: दुधाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एकीकडं दुधाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन, दुसरीकडं उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला मिळणारा कमी भाव... तर तिसरीकडं देशात पडून असलेली हजारो टन दूध पावडर... नेमकं काय आहे हे पांढरं संकट..? 

भारत सरकारनं १९७१ साली डॉ. कुरियन यांचा मार्गदर्शनाखाली 'धवलक्रांती' म्हणजेच 'ऑफरेशन फ्लड' योजना सुरु केली. तेव्हापासून भारतात दुधाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. दूध उत्पादनात भारतानं जगात अव्वल क्रमांक गाठला. भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्राझील हे देशसुद्धा दूध उत्पादनात अग्रेसर आहेत... पण सगळीकडंच दुधाचा प्रश्न बिकट झालाय.

भारतात आजमितीला २ लाख ५० हजार टन दूध पावडर तर दीड लाख टन लोणी पडून आहे. त्यामुळं बाजारपेठेच्या नियमानुसार दूध पावडरचे भाव मोठ्या प्रमाणात घसरलेत. दूध संघांना एका किलो दूध पावडर तयार करण्यासाठी २५० रुपये इतका उत्पादन खर्च येतो. पण याच दुधाला बाजारपेठेत फक्त १६० रुपये दर मिळतोय.

परिणामी दूध संघ तोट्यात आलेत... त्यातच दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन शुल्कापेक्षा कमी दर मिळतो. एका म्हशीचं संगोपन करण्यासाठी दिवसाला शंभर रूपयांहून अधिक खर्च येतो. पण त्या तुलनेत दूध संघ दर देत नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

याआधी दुधाच्या धंद्यात २५ टक्के खर्च आणि ७५ टक्के नफा होता. मात्र पशूखाद्याचे दर भरमसाठ वाढल्यानं हे चित्र उलटं झालंय. सध्या तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे १८ ते १९ रूपये तोटा सहन करावा लागतोय.

दूध पावडरच्या घसरलेल्या किंमती आणि पशूखाद्याचे वाढलेले दर यामुळं दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेत. केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातलाच दूध व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.