ठाणे महापौरपदी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंची बिनविरोध निवड

ठाण्याच्या अठराव्या महापौर म्हणून आज मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झालीये.  

Updated: Mar 6, 2017, 04:02 PM IST
ठाणे महापौरपदी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंची बिनविरोध निवड title=

ठाणे : ठाण्याच्या अठराव्या महापौर म्हणून आज मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झालीये.  

ठाण्यात भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीनंही महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानं मीनाक्षी शिंदे बिनविरोध निवडून आल्या. 

रमेश मढवी यांची उपमहापौरपदी निवड झालीये. यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत जनतेचा बहुमताचा कौल शिवसेनेला मिळाला. या महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक बहुमताने निवडून आले.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे ठाणेकरांचे आभार व्यक्त करण्यासाठी ठाण्यात आले. त्यावेळी ठाणेकरांना मी वंदन करतो असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.