नागपूर : लाचखोरीच्या आरोपात ताब्यात घेत गुन्हा दाखल केलेल्या मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यात.
मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता मिनाक्षी गजभिये यांना एसीबीने 15 हजारांची लाच घेताना पकडले होते. मात्र कागदोपत्री कारवाई करून गुन्हा दाखल करेपर्यंत सोमवारी रात्री दहा वाजले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे महिला आरोपीला अटक करता येत नाही. त्यामुळे एसीबीने मंगळवारी सकाळी अकरापर्यंत एसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देत गजभिये यांना एसीबीने सोडले होते.
मात्र आरोपी अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये मंगळवारी एसीबी समोर उपस्थित झाल्या नाही. नागपूरच्या घरी आणि कार्यालयातही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे एसीबीचे पथक गजभिये यांचा शोध घेतंय.