नाशिकमध्ये पार्किंगची समस्या अशी सुटणार

शहरातील अनेक भागात वाहनतळ  उभारले जाणार असून त्रिस्तरीय पार्किंग व्यव्यस्था केली जाणार आहे. 

Updated: Dec 12, 2016, 11:07 PM IST
नाशिकमध्ये पार्किंगची समस्या अशी सुटणार title=

नाशिक : शहरातील पार्किंगची समस्या मार्गी लागून वाहतूक कोंडीतून नाशिककरांची सुटका होण्याची चिन्ह दिसू लागली आहे.  शहरातील अनेक भागात वाहनतळ  उभारले जाणार असून त्रिस्तरीय पार्किंग व्यव्यस्था केली जाणार आहे. 

लावण्य्साठी नियोजन केले जाणर आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून शहरात  ५० हून अधिक ठिकाणी वाहनतळ उभरली जाणार आहेत. त्रिस्तरीय पार्किंगची सुविधा केली जाणार आहे. वाहतुकीला अडथला ठरणार नाही अशा ३४ रस्त्यावर वाहन लावता येणार आहेत. 

काही मैदान आणि मोकळ्या भूखंडाचा उपयोग देखील पार्किंगसाठी केला जाणार आहे. त्याच बरोबर शहरात १६ ठिकाणी रोटरी पार्किंग सिस्टीम उभारली जाणार आहे. यात्रिक पद्धतीच्या या मध्ये दोन गडांच्या जागेत १४ वाहन पार्क केली जाणार आहेत.

पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देतानाच  कँशलेश पद्धतीने मोबाईल अँपच्या माध्यमातून पैसे आकरणी केली जाणार आहे.. मात्र या सर्व अद्यापतरी कागदावरच्या घोषणा दिसत आहेत.