शहीद जवानाचे सैन्य किट बसस्थानकावर बेवारस

उरी येथील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या यवतमाळच्या पुरड येथील विकास कुडमेथेंची सैन्य किट यवतमाळच्या बसस्थानकावर बेवारस आढळल्याने खळबळ उडाली आहे.  दरम्यान शहीद जवानाचे साहित्य असे बेवारस आढळल्यानें संतापही व्यक्त होत आहे.

Updated: Jan 20, 2017, 08:24 AM IST
शहीद जवानाचे सैन्य किट बसस्थानकावर बेवारस title=

यवतमाळ : उरी येथील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या यवतमाळच्या पुरड येथील विकास कुडमेथेंची सैन्य किट यवतमाळच्या बसस्थानकावर बेवारस आढळल्याने खळबळ उडाली आहे.  दरम्यान शहीद जवानाचे साहित्य असे बेवारस आढळल्यानें संतापही व्यक्त होत आहे.

शहीद विकास यांच्या सैन्यातील पेटी सोबतच अन्य सैनिकांच्या ४ बॅग देखील बेवारस मिळाल्या आहेत. आगार प्रमुखाला हे साहित्य बेवारस सापडल्यानंतर त्यांनी लागलीच वडगाव रोड पोलिसांना सूचना दिली. त्यानुसार पोलिसांनी हे सर्व साहित्य ताब्यात घेतले. 

हे साहित्य चोरी झाले होते का? की कुणाच्या बेपर्वाई ने ते बसस्थानकावर पोहोचले ? या बाबत पोलीस तपास करीत आहे. यवतमाळ मध्ये नुकतीच सैन्य भरती पार पडली त्यावेळी जीतू जाधव हा तोतया मिल्ट्रीमन पकडल्या गेला होता. तो सैन्याचा गणवेश घालून होता. त्याचा या बेवारस साहित्याशी सबंध आहे का? यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहे.