कौमार्याची परीक्षा घेणारा मुलीला नांदवायला तयार

 नगर जिल्ह्यातल कौर्मायाच्या परिक्षेत नापास झाल्यानं लग्न नाकारणाऱ्या नवऱ्या मुलानंच आता मुलीला परत आणण्याची तयारी केली. मुलगा मुलीला आणण्यासाठी तिच्या गावी जात असल्याची माहिती पुढे येतेय. 

Updated: Jan 3, 2019, 01:33 PM IST
कौमार्याची परीक्षा घेणारा  मुलीला नांदवायला तयार title=

नगर :  नगर जिल्ह्यातल कौर्मायाच्या परिक्षेत नापास झाल्यानं लग्न नाकारणाऱ्या नवऱ्या मुलानंच आता मुलीला परत आणण्याची तयारी केली. मुलगा मुलीला आणण्यासाठी तिच्या गावी जात असल्याची माहिती पुढे येतेय. 

नगर जिल्ह्यात.... नुकतंच लग्न झालेल्या मुलीची कौमार्याची परीक्षा घेण्याची संतापजनक कृती जातपंचायतीनं केलीय....  या कौमार्याच्या परीक्षेत ती नापास झाली. म्हणून तिला झिडकारण्यात आलं. 

जातपंचायतीनं तिला कौमार्याच्या परीक्षेत नापास ठरवलं. त्यानंतर तिच्या अंगावरचे सगळे दागिने घेऊन लग्न मोडून नव-या मुलाकडचे लोक निघून गेले. 

आता मीडियाचा दबावानं, महिला आयोग आणि सरकारनं तातडीनं पावलं उचलायला सुरूवात केली...आणि अखेर मुलीला नाकारणारा तो नवरा मुलगा आता तिला पुन्हा घरी आणण्यास तयार झालाय.