थंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठला, मुंबईलाही हुडहुडी!

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीये. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. 

Updated: Dec 15, 2014, 10:56 AM IST
थंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठला, मुंबईलाही हुडहुडी! title=

मुंबई: उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीये. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. 

नाशिक जिल्ह्यात तपमान ६.२ अंशांपर्यंत खाली घसरलंय. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तपमान चांगलंच खाली आल्यानं नागरिकांना यंदा प्रथमच कडाक्याच्या थंडी अनुभवायला मिळतेय. 

मुंबईकरही गुलाबी थंडीचा अनुभव घेतायत. मुंबईकरांचा वीकेन्ड आणि नव्या आठवड्याची सुरुवात ही कुडकुडत झाली आहे. काल मुंबईच्या उपनगरांमध्ये पारा १६.८ अंशांवर घसरला होता. शनिवारी पहाटे झालेल्या तुफान पावसानं मुंबईचा पारा खालावला असून ही थंडी आणखी वाढत जाणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. 

दरम्यान उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रकोप आणखी वाढल्यास महाराष्ट्राचा पारा आणखी खालावण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. त्यामुळं यंदा डिसेंबरमध्ये मुंबईत थंडीचं आगमन झाल्याचं चित्र आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.