भिवंडीत इमारतीला भीषण आग

भिवंडीच्या कासिमपूर भागातील एका चार मजली इमारतीला भीषण आग लागलीये. 

Updated: Apr 12, 2016, 09:58 AM IST
भिवंडीत इमारतीला भीषण आग title=

ठाणे : भिवंडीच्या कासिमपूर भागातील एका चार मजली इमारतीला भीषण आग लागलीये. 

या इमारतीत तब्बल १५० जण अडकल्याची शक्यता आहे. या इमारतीत 75 फ्लॅटस आहेत. या बिल्डिंगच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर कापड तयार करण्याचं काम चालतं. 

तब्बल अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सकाळी सातच्या सुमारास ही आग लागली. इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.