औरंगाबाद : महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ आहे. गेल्या ६० वर्षात महाराष्ट्राला काँग्रेसने कुठे नेवून ठेवलाय. महाराष्ट्राला लुटलं गेलं आहे. विकास केला नाही. कुठे नेला आहे, याला कोण जबाबदार आहे, असा सवाल करत महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. ते जाहीर प्रचार सभेत बोलत होते.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
-तुम्ही जाताना आपल्या आजुबाजुचा कचरा उचला. हे काम आपले आहे. नगरपालिकेचे नाही. कुठेही कचरा दिसणार नाही याची काळजी घ्या.
-महाराष्ट्र मागे पडला तर भारत विकासात मागे जातो. त्यामुळे महाराष्ट्रात बहुमताचे सरकार हवे.
-महाराष्ट्राला लुटलं गेलं आहे. विकास केला नाही. कुठे नेला आहे. याला कोण जबाबदार आहे .
-कोणी घालवला महाराष्ट्र मागे? कोण आहे याला जबाबदार. त्यांच्या हातात पुन्हा महाराष्ट्र देणार का?
- माझे एकट्याचे यश नाही. करोडो लोकांचे यश आहे. म्हणून ३० वर्षानंतर दिल्लीत बहुमताचे सरकार आलेय. त्यामुळे महाराष्ट्रात बहुमत द्या.
-गुजरातचा मोठा भाऊ महाराष्ट्र आहे. गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे..हा महाराष्ट्र का मागे गेलाय.
-ताजमहालपेक्षा औरंगाबदमध्ये सौंदर्य आहे. पर्यटन विकासाला चालना मिळाली पाहिजे.
-मोदींनी पेट्रोल,डिझेलचे दर कमी केले की नाहीत?
- भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास मानसरोवर यात्रेचे दरवाजे आम्ही उघडून दिले.
- गरीबांच्या फायद्यासाठी काँग्रेसने बँकांचे राष्ट्रीयकरण केले, मात्र बँकांमध्ये गरीब दिसत नाहीत.
- साक्षरतेत महाराष्ट्र १२ व्या स्थानावर, विकासदारात राज्य १५ व्या क्रमांकावर, अनेक राज्य महाराष्ट्रापुढे निघून गेली, याला कोण जबाबादार?.
- अमेरिकेत भारताचा डंका वाजतोय तो सव्वाशे कोटी जनतेमुळे. महाराष्ट्राचा डंकाही जगभरात वाजवायचा असेल तर भाजपाला संपूर्ण बहुमत द्या.
- राजकारणातील घाण व प्रत्यक्ष समाजातील कचरा साफ करायची ववेळ आली आहे.
- औरंगाबादमधील अजंठा-एलोराकडे पर्यटकांना आकर्षित करायचं आहे, पण त्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक.
- आज हायफाय वायफायचा जमाना आहे. मी म्हणतो वायफाय पाहिजे त्याचबरोबर साफसफाईही पाहिजे. महाराष्ट्रात भाजप सरकार करुन साफसफाई करा.
- औरगांबादमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्याची ताकद.
- जे सरकार राजकीय अस्पृश्यता करतं जे जनतेच्या फायद्याचे आहे का ?.
- महाराष्ट्राच्या विकासाशिवाय दिल्लीचा विकास होऊ शकत नाही. महाराष्ट्रात आघाडी सरकार असेल, तर मी दिल्लीतून कितीही दिलं तर ते कुठे जाईल?
- दिल्लीत मोदीला साथ हवीय. त्यामुळे महाष्ट्राला तुमची साथ द्या. महाराष्ट्राला ताकद दिली तर मी दिल्लीतील सरकारला ताकद मिळेल. मी महाराष्ट्राला अधिक देईन. दिल्लीत सरकार. महाराष्ट्रात सरकार नसेल तर काय उपयोग. महाराष्ट्रात स्थिर सरकार पाहिजे.
- महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे, येथील नागरिक मागे राहूच शकत नाहीत.
- एकेकाळी महाराष्ट्राने देशातील अनेकांना रोजगार दिला, मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
- आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्य उध्वस्त केले. महाराष्ट्र गुजरातचा मोठा भाऊ आहे, मात्र तरीही आज गुजरात पुढे आहे आणि महाराष्ट्र मागे पडला आहे.
- एकेकाळी महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर होता, मात्र आता कुठे आहे?
- काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय येथील जनतेने घेतला आहे.
- दिल्लीत बहुमतात सत्ता दिलीत. हा मोदी तुमचा सेवक आहे.
- ही निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारी आहे. महाराष्ट्र कसा घडेल याचा तुम्ही विचार केला पाहिजे.
- मराठवाड्याच्या भूमीला मी वंदन करतो, मराठीत अभिवादन
- नरेंद्र मोदींचे औरंगबादमध्ये मराठीतून भाषण सुरू.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.