मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांना मुंबईमध्ये सवलतीच्या दरात भूखंड देण्यात आला. यावरून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. या टीकेनंतर सरकारने यासंदर्भातील धोरणच रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
सरकारनं हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं लागू केला आहे, त्यामुळे हेमा मालिनीला बाजार भावानुसार भूखंडाची रक्कम द्यावी लागणार आहे.
वेगेवेगळ्या संस्था आणि व्यक्तींना सवलतीच्या दरात भूखंड देण्याचे सरकारने 1983 साली धोरण आखले होते. या धोरणानुसार हेमा मालिनीसह अनेकांना सवलतीच्या दरात भूखंड मिळाले होते.
याच धोरणानुसार हेमा मालिनीला केवळ ३५ रुपये चौरस मीटर अशा नाममात्र दराने मुंबईतील वर्सोवा इथे भूखंड देण्यात आला होता. हेमा मालिनी यांना दिलेल्या भूखंडाची किंमत ४० कोटी रुपये होती, मात्र हा भूखंड हेमा मालिनी यांना केवळ ७० हजार रुपयात देण्यात आला होता.
पण हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसेंना विश्वासात न घेताच घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.