महालक्ष्मीचं नवं रुप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी

रासायनिक प्रक्रियेनंतर श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन आजपासून भाविकांना घेता येणार आहे. 

Updated: Aug 6, 2015, 09:56 AM IST
महालक्ष्मीचं नवं रुप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी title=
महालक्ष्मीचं नवं रुप आणि जुनी मूर्ती

कोल्हापूर : रासायनिक प्रक्रियेनंतर श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन आजपासून भाविकांना घेता येणार आहे. 

२५ जुलैपासून ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मूर्तीचं दर्शन घेता येत नव्हतं... त्यानंतर या मूर्तीचं पहिलं दर्शन 'झी २४ तास'च्या माध्यमातून झालं होतं.

आज सकाळी प्रक्रियेनंतर मूर्तीची पूजा सुरू झाली. त्यानंतर आता भक्तांसाठीही मूर्तीचं दर्शन खुलं झालंय. आंबाबाईचं सगुण-रूप पाहण्यासाठी आसूसलेल्या भाविकांनी मंदिरात गर्दी केलीयं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.