कोयना धरणातील पाणी कर्नाटकला सोडले

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सामंजस्य करारा नुसार कोयना धरणातून प्रती सेकंद ९०७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीत केला जातोय. कर्नाटकात भीषण पाणी टंचाई असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 12, 2017, 10:07 AM IST
कोयना धरणातील पाणी कर्नाटकला सोडले title=

सातारा : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सामंजस्य करारा नुसार कोयना धरणातून प्रती सेकंद ९०७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीत केला जातोय. कर्नाटकात भीषण पाणी टंचाई असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. 

राज्य सरकारनं २.६५ टीएमसी पाणी कर्नाटकसाठी सो़डण्याचा निर्णय घेतलाय. या पाण्याचा बदल्यात सोलापूर आणि सीमा लगतच्या भागात अलमट्टीमधून पाणी परत घेणार अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 

मंगळवारी रात्री १० वाजता विसर्ग सुरु केल्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीये. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील  नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोयना धरण कार्यकारी अभियंता जानेश्वर बागडे यांनी ही माहिती दिली आहे.