कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपचा टोलमाफी मुद्याला 'खो'

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये टोलमाफीचा मुद्दा नसल्याबद्दल शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. भाजपने काल हा जाहीरनामा प्रकाशित केला.

Updated: Oct 21, 2015, 03:59 PM IST
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपचा टोलमाफी मुद्याला 'खो' title=

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये टोलमाफीचा मुद्दा नसल्याबद्दल शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. भाजपने काल हा जाहीरनामा प्रकाशित केला.

यात संपूर्ण टोलमाफीचं आश्वासन असेल, अशी कोल्हापूरकरांना अपेक्षा होती. मात्र भाजपानं हा मुद्दा का टाळला, याबाबत काही तर्क आता लढवले जातायत.

विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या जाहीरनाम्यामध्ये टोलमाफीचा मुद्दा पहिला होता. मात्र अद्याप कोल्हापूरची टोलधाडीतून संपूर्ण सुटका करणं राज्य सरकारला शक्य झालेलं नाही. 

मिळाली आहे ती टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती. या अल्पशा यशाचा पाढा वाचायची वेळ येऊ नये, यासाठी भाजपानं जाहीरनाम्यातून हा मुद्दाच वगळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यानंतर पाटील यांचा विचारल्यावर मात्र निवडणुकीनंतर संपूर्ण टोलमु्क्तीबाबत निर्णय़ होईल, असं सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.