कोल्हापुरात अख्ख्या कुटुंबालाच जाळून मारण्याचा प्रयत्न

कोल्हापुरातील रंकाळा परिसारात तोरस्कर आणि भोसले या दोन गटाच्या वादातून अज्ञातांनी रिक्षा आणि मोटारसायकल जाळली आहे. तसंच परिसरातील पानारी मळा या भागात राहाणाऱ्या किशोर भोसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Updated: Nov 30, 2014, 10:10 AM IST
कोल्हापुरात अख्ख्या कुटुंबालाच जाळून मारण्याचा प्रयत्न title=

कोल्हापूर: कोल्हापुरातील रंकाळा परिसारात तोरस्कर आणि भोसले या दोन गटाच्या वादातून अज्ञातांनी रिक्षा आणि मोटारसायकल जाळली आहे. तसंच परिसरातील पानारी मळा या भागात राहाणाऱ्या किशोर भोसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

किशोर भोसले यांच्या घरासमोर पार्क केलेल्या रिक्षा आणि मोटारसायकलला लक्ष करत अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री ही दोन्ही वाहनं पेटवून दिली. त्यामुळं रिक्षा आणि मोटारसायकल काही तासात भष्मसात झाले आहेत.

मध्यरात्री 2 वाजता घरातील सर्व झोपलेले असताना रणजीत मोरस्कर गटातील गुंडांनी घरात रॉकेलचे बोळे फेकले आणि घराला आग लावून दिली. तसंच त्यांनी दाराच्या कड्याही लावल्या. त्यामुळं भोसले यांच्या गरोदर पत्नीसह अन्य तीनजण आतमध्येच अडकले. मात्र घरामागील दरवाज्यातून बाहेर पडणं भोसले कुटुंबियांना शक्य झालं आणि अनर्थ टळला.
 
हा हल्ला कोणाच्याही जिवावर बेतला नसला तरी घरातील साहित्य मात्र जळून खाक झालं आहे. किशोर भोसले आणि रणजीत पांडूरंग मोरस्कर यांच्यात वारंवार हाणामाऱ्या होत असतात. त्यातून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मोरस्कर गटाच्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.