कोल्हापूरच्या महापौर लाच स्वीकारतांना सापडल्या

कोल्हापूरच्या महापौरांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. मागील दोन तासांपासून ही चौकशी सुरू आहे. कोल्हापूर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. 

Updated: Jan 30, 2015, 10:10 PM IST
कोल्हापूरच्या महापौर लाच स्वीकारतांना सापडल्या title=

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. मागील दोन तासांपासून ही चौकशी सुरू आहे. कोल्हापूर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. 

या प्रकरणात राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांची दोन तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं आहे. उद्या सकाळी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. 

महिलांना रात्री सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्यामुळे तृप्ती माळवी यांनी तूर्तास सोडून देण्यात आलं आहे. या प्रकरणी महापौरांच्या पीएला ताब्यात घेण्यात आलंय.

कशासाठी मागितली होती लाच?
रस्ता रूंदीकरणात गेलेली पर्यायी जागा देण्यासाठी, महापौरांनी ४० हजार रूपयांची लाच मागितली होती. आपली परिस्थिती नसल्याने आपण सुरूवातीला काही पैसे देतो, असे तक्रारदार पाटील यांनी महापौरांच्या पीए यांना सांगितले, मात्र त्यांना पूर्ण पैसे हवे आहेत, तेव्हा तुम्ही चेंबरमध्ये जाऊनच पैसे द्या, असं सांगितल्यावर तक्रारदारांनी चेंबरमध्ये जाऊन पैसे दिले. 

आपल्याकडे फक्त १६ हजार रूपये असल्याचं पाटील यांनी महापौरांना सांगितलं, आणि ठिक आहे १६ तर १६ असं सांगून महापौरांनी लाच स्वीकारली आणि त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं असल्याचं सांगण्यात येतंय.

कोल्हापुरातील सर्वोच्च नागरिकाला अटक झाल्याने आणि लाच स्वीकारल्याने कोल्हापूरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.