कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये क्लोरीनची गळती झाल्याने २५ जण गंभीर जखमी असून एका महिलेचा मृत्यू झालाय. उद्यमनगरच्या एसएस इंटरप्राईसमध्ये ही वायू गळती झालीय. क्लोरीनचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील उद्यमनगर इथे क्लोरींग गॅसचे लिकेज झालेय. लक्ष्मीबाई माने या महिलेचा मृत्यू झालाय. तर गंभीर व्यक्तींवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि वालावलकर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, तीन फायर ब्रिगेडचे कर्मचारी अत्यवस्थ आहेत. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
दुकानात दुपारी एकच्या सुमारात क्लोरीन वायूची गळती झाली. त्यामुळे या भागात असणाऱ्या अनेकांचा श्वास अचानक गुदमरु लागला आणि नागरिकांची तारांबळ उघाडी. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन तात्काळ अग्नीशामक दलाला या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत अग्नीशामक दलाचे जवणांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत.
क्लोरीन गॅसच्या टाकीवर सुरुवातीला पाण्याचा मारा केला आणि परिस्थीती हातळण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासाहून अधिककाळ प्रयत्न करुन अग्नीशामक दलाच्या जवानांनी परिस्थीती नियंत्रणात आणली आणि त्यानंतर क्लोरीन गॅस बंद केला. तोपर्यंत या परिसरात मोठ्या प्रमाणात वायू पसरल्यामुळे २० पेक्षा जास्त लोकांना श्वासनाचा त्रास जाणवू लागलाय. त्यांना तात्काळ उपचारासाठी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि वालावालकर हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरु असतानाच लक्ष्मीबाई माने या महिलेचा मृत्यू झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.