राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम दोषी, एक वर्षाचा तुरुंगवास

शासकीय कामात अडथळा आणि तोडफोड केल्याप्रकरणी दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Updated: Dec 2, 2015, 01:38 PM IST
राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम दोषी, एक वर्षाचा तुरुंगवास title=

रनागिरी : शासकीय कामात अडथळा आणि तोडफोड केल्याप्रकरणी दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी जाऊ शकते.

खेडच्या सत्र न्यायालयानं यासंदर्भात आज निर्णय दिला. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आमदार कदम दोषी आढळल्याने खेड सत्र न्यायालयाने निकाल देताना ही शिक्षा ठोठावली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना एक वर्षाची शिक्षा झाली आहे. 

२००५ मध्ये खेड तहसील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी आज हा निर्णय देण्यात आला.  तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण गेडाम यांनी कदम यांच्या विरोधात तक्रार केली होती. संजय कदम त्यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.