खानदेशातील पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया

 खानदेशातली पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्याचा मान धुळ्यातले डॉक्टर यतीन वाघ यांनी मिळवला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 9, 2017, 07:06 PM IST
खानदेशातील पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया title=

धुळे : खानदेशातली पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्याचा मान धुळ्यातले डॉक्टर यतीन वाघ यांनी मिळवला आहे. 

डॉक्टर यतिन वाघ यांनी आपल्या धुळ्यातल्या रुग्णालयात अत्यल्प खर्चात, ही बायपास आणि हृदयाच्या छेदाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. यामुळे ग्रामीण भागातल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कारण अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी खानदेशातील रुग्णांना, मुंबई, नाशिक, पुण्याला जावं लागतं. आता या रुण्गांना खानदेशातच यावरचा पर्याय मिळाला आहे. अर्ध्या पैशात ही शस्त्रक्रिया होणार असल्याचं डॉ. यतिन वाध यांनी म्हटलं आहे.