नागपूर : राज्यातल्या नगरपालिका निवडणुकीच्या चौथा आणि अखेरचा टप्पा आज पार पडला. अखेरच्या टप्प्यातही भाजपनंच बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत.
तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असून राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली आहे.
नोटबंदीनंतरही राष्ट्रवादीला पाहिजे तशी कामगिरी राज्यात दाखवता आलेली नाही, विदर्भात तर राष्ट्रवादीचा पाय आणखी खाली गेला आहे. शिवसेनेची स्थिती देखील तशीच आहे.