केडीएमसी अधिकारी गणेश बोराडेंना लाच घेताना दुसऱ्यांदा पकडलं

केडीएमसीचे 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडेंना एसीबीनं दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.

Updated: Nov 5, 2016, 06:22 PM IST
केडीएमसी अधिकारी गणेश बोराडेंना लाच घेताना दुसऱ्यांदा पकडलं title=

डोंबिवली : केडीएमसीचे 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडेंना एसीबीनं दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. लाचप्रकरणी बोराडे दुसऱ्यांदा ठाणे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले.

याआधी गणेश बोराडेंनी अनधिकृत बांधकामाची नोटीस बाजावण्यासाठी त्यांनी साडेसहा लाखांची लाच मागितली होती. आता पुन्हा एकदा दीड लाखांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली.