कन्हैय्याला पुण्यात न बोलावण्याच्या धमकीनंतर गुन्हा दाखल

रानडे इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांना कन्हैया कुमारला न बोलावण्याबाबत धमकावण्यात आल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे. 

Updated: Mar 24, 2016, 08:25 PM IST
कन्हैय्याला पुण्यात न बोलावण्याच्या धमकीनंतर गुन्हा दाखल title=

पुणे : रानडे इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांना कन्हैया कुमारला न बोलावण्याबाबत धमकावण्यात आल्याचाही गुन्हा दाखल झाला आहे. 

रानडे इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारला निमंत्रण दिलंय. मात्र त्याला इथे बोलावू नये, यासाठी विद्यार्थ्यांना धमकी देण्यात आली. याबाबत ओंकार कदम आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

फर्ग्युसन कॉलेजमध्ये बुधवारी झालेल्या राड्य़ानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दंगलीची कलमं लावण्यात आली आहेत. 

जितेंद्र आव्हाड यांना झालेली धक्काबुक्की आणि गोंधळाचं फुटेज उपलब्ध आहे. हे फुटेज तपासून दोषींविरोधीत कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. 

दरम्यान, हैदराबादमधल्या सार्वजनिक कार्यक्रमात जेएनयूमधला विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या दिशेनं चप्पल भिरकावण्याचा प्रकार घडलाय. 

कन्हैयासारख्या देशद्रोह्याला बोलू द्यायला नको अशा घोषणा देत कार्यक्रमातल्या एकानं कन्हैयाच्या दिशेनं चप्पल फेकली. 
त्यानंतर तातडीनं पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्याला कार्यक्रमातून बाहेर नेत ताब्यात घेतलं, अशा प्रकारांना आपण घाबरत नसून यापुढंही निर्भि़डपणे आपले विचार मांडतच राहू, असा निर्धार कन्हैयानं व्यक्त केलाय. 

कन्हैया कुमार हैदराबाद आणि विजयवाडाच्या दोन दिवसांच्या दौ-यावर आहे. देशातल्या शैक्षणिक संस्थांवर हल्ले होत असल्याचा आरोप कन्हैया कुमारनं केलाय.