कामशेत बोगद्यातील अपघातात ३ जणांचा मृत्यू, ६ जखमी

कामशेत बोगद्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झालेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 7, 2017, 06:31 PM IST
कामशेत बोगद्यातील अपघातात ३ जणांचा मृत्यू, ६ जखमी title=

पुणे : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर कामशेत बोगद्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झालेत. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारात एक्सप्रेस हायवेवर पुण्याकडून मुंबईकडे जाणा-या लेनवर हा अपघात घडला. वोल्वो बस कामशेत बोगद्यामध्ये शिरताना मागच्या बाजूने वेगात येणारी होंडा मोबिलिओ कार बसला मागून धडकली.

 या धडकेत कारमध्ये बसलेल्या 9 जणांपैकी 3 जण जागीच ठार झाले तर 6 जण जखमी झाले. जखमींना निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या धडकेने बसमधील ऑईल टँक फुटल्याने सर्व ऑईल रस्त्यावर पसरलंय. यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतून कोंडी झालीय. सध्या एक लेन सुरू करून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.