कल्याणचा स्कायवॉक झाले 'कचराकुंडी'

 स्मार्ट सिटी च्या नावाने डंका पिटणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अक्षरशा अब्रूची लक्तरे निघत आहेत अशीच भयंकर गचाळ अवस्था रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकची झाली आहे..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 25, 2017, 07:38 PM IST
 कल्याणचा स्कायवॉक झाले 'कचराकुंडी'  title=

विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण डोंबविली :  स्मार्ट सिटी च्या नावाने डंका पिटणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अक्षरशा अब्रूची लक्तरे निघत आहेत अशीच भयंकर गचाळ अवस्था रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकची झाली आहे..
 
 हा स्कायवॉक आहे की कचराकुंडी अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..कोट्यवधी रुपये खर्च करून हा स्कायवॉक बांधले असले तरी त्याचा सामान्य प्रवाशांना काहीच उपयोग होत नसतो..


 
 आता तर या स्कायवॉकवर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेलं दिसून येतात..त्यातून नाक मुठीत घेऊन कसेबसे प्रवाशी ये जा करतात.. सुमारे महिनाभर पासून हा स्कायवॉक रोज कचरामय होतो..
 
 स्कायवॉकवरील अनधिकृत  फेरीवाले त्यांच्या धंद्याच्या ठिकाणची साफसफाई करतात मात्र  उरलेला सर्व परिसर मात्र उकरड्याला लाजवेल असा गलिछ बनला आहे ..


 
 स्कायवॉक वरील स्वछतेसाठी महापालिकेने कंत्राटदार  सुद्धा नेमला   होता मात्र महापालिका  योग्य मोबदला  देत नाही हे कारण सांगून त्याने येथील साफसफाई करणेच बंद केले आहे..
 
 मात्र या सर्वांचा त्रास होतो आहे तो स्कायवॉकवरून ये जा करणाऱ्या नागरिकांना..महापालिका प्रशासन स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवण्यापेक्षा नागरिकांना चालण्या योग्य स्कायवॉक करेल का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.