पाकिस्तानच्या ताब्यातील जवानाच्या आजीचे निधन

धुळ्यातला एक जवान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलाय. चंदू बाबूलाल चव्हाण असे जवानाचे नाव आहे.  

Updated: Sep 30, 2016, 02:01 PM IST
पाकिस्तानच्या ताब्यातील जवानाच्या आजीचे निधन title=

नवी दिल्ली : धुळ्यातला एक जवान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलाय. चंदू बाबूलाल चव्हाण असे जवानाचे नाव आहे.  

काल रात्री त्यांच्या कुटुंबियांना चंदू बेपत्ता असल्याचा फोन आला. चंदू पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं वृत्त समजल्यानंतर चंदू यांच्या आजीला मोठा धक्का बसला.

दरम्यान, हा जबर धक्का सहन न झाल्याने  त्यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. चंदू चव्हाण हे २३ वर्षांचे असून मुळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील आहेत.