उरीतील शहीद जवानांच्या पत्नी, कुटुंबीयांकडून सर्जिकल स्टाईकबद्दल स्वागत

उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला आहे. मोठी लष्करी कार्यवाही करत 35 अतिरेक्यांना लष्कराने कंठस्नान घालते आहे. सर्जिकल स्टाईकबद्दल उरीतील शहीद जवानांच्या पत्नींकडून स्वागत करण्यात आले आहे.

Updated: Sep 30, 2016, 08:02 AM IST
उरीतील शहीद जवानांच्या पत्नी, कुटुंबीयांकडून सर्जिकल स्टाईकबद्दल स्वागत title=

सातारा : उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला आहे. मोठी लष्करी कार्यवाही करत 35 अतिरेक्यांना लष्कराने कंठस्नान घालते आहे. सर्जिकल स्टाईकबद्दल उरीतील शहीद जवानांच्या पत्नींकडून स्वागत करण्यात आले आहे.

18 सप्टेंबर ला उरी हल्ल्यात साताऱ्यातील जाशी येथील  लान्स नायक चंद्रकांत गलांडे शहीद झाले होते. भारतीय लष्कराने जी धडक कारवाई केली आहे त्याबद्दल शहीद चंद्रकांत गलांडे यांचा कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र अतिरेक्यांचा बिमोड होई पर्यंत हि कार्यवाही अशीच सुरु ठेवली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 भारतीय सैन्याचा अभिमान

भारतीय सैन्याने एलओसी पार करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने उरी दहशतवादी हल्ल्यातील 18 शहीद वीरजवानांना श्रद्धांजली मिळाली, अशी प्रतिक्रिया यवतमाळच्या पुरड येथील शहीद जवान विकास जनार्दन कुडमेथे याची वीरपत्नी स्नेहा कुडमेथे यांनी दिली आहे. पुरड ग्रामस्थांनी देखील भारतीय सैन्याचा अभिमान व्यक्त करीत पाकिस्तान विरुद्ध चोख कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.