धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला पकडण्यात यश

जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पालमध्ये एका अस्वलाला पकडण्यात आलंय. गावकऱ्यांनी अस्वलाला पकडून वन विभागाच्या हवाली केलं आहे.

Updated: Sep 3, 2014, 10:52 AM IST
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला पकडण्यात यश title=

जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पालमध्ये एका अस्वलाला पकडण्यात आलंय. गावकऱ्यांनी अस्वलाला पकडून वन विभागाच्या हवाली केलं आहे.

एका गुराखी मुलावर या अस्वलाने हल्ला केला होता, यात या मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक पाळीव प्राण्यांवरही या अस्वलाने हल्ले केले होते. 

या अस्वलाने मागील 15 दिवसापासून पाल परिसरात धुमाकूळ घातला होता, वनविभागालाही याची सूचना देण्यात आली होती. पण वनविभागाने कोणतीही हालचाल केली नाही.

अखेर पालच्या गावकऱ्यांना शेतीतील ठिबक नळ्याच्या आधाराने या अस्वलाला पकडण्यात यश आलं, यानंतर या अस्वलाला वन विभागाच्या हाती स्वाधीन करण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.