जळगाव : जळगाव जिल्ह्यात काही गावांमध्ये सध्या सिमेंट रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे, सर्वात जास्त कामं जिल्हा परिषदेकडून सुरू आहेत.
यात ठेकेदारांच्या मदतीने आपला आपल्या पद्धतीने रस्त्यांचा 'अर्थ' अधिकाऱ्यांनी काढण्यास सुरूवात केली आहे. याचा मोठा फटका हा ग्रामीण जनतेला बसतोय, कारण कंत्राटात ठरल्याप्रमाणे कामं होतांना दिसत नाहीत.
रस्त्यांवर खडी ऐवजी विहीरीचं खोदकाम सुरू असतांना निघणारे मोठे दगड टाकण्यास कंत्राटदारांनी सुरूवात केली आहे. यामुळे कंत्राटदारांचं काम निम्मे पैशांनी होतंय, पण रस्त्यांची उंची एक पासून - दीड फुटांपर्यंत वाढत चालली आहे.
वर दिलेला फोटा हा चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावातला आहे. जिथे रस्त्याच्या कामात पाण्याचा हातपंप एवढा दाबला गेलाय की, आता पाण्याची बादली ठेवायची कुठे हा प्रश्न पडला आहे.
जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग मात्र याबाबतीत दुर्लक्ष करत आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामांकडे कानाडोळा केल्याची चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.