जेलमधून फरार झालेला तिसरा कैदी अटकेत, २ अजूनही फरार

नागपूरच्या सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या ५ कैद्यांपैकी तिसऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी आज अटक केली. गोलू उर्फ आकाश ठाकूर असं त्याचं नाव असून, मध्य प्रदेशातल्या पांढूर्णा इथून त्याला अटक करण्यात आली. 

Updated: May 18, 2015, 09:51 PM IST
जेलमधून फरार झालेला तिसरा कैदी अटकेत, २ अजूनही फरार title=

नागपूर: नागपूरच्या सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या ५ कैद्यांपैकी तिसऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी आज अटक केली. गोलू उर्फ आकाश ठाकूर असं त्याचं नाव असून, मध्य प्रदेशातल्या पांढूर्णा इथून त्याला अटक करण्यात आली. 

याआधी याच महिन्याच्या १४ तारखेला मोहम्मद शोएब खान उर्फ शिब्बू सलीम खान आणि प्रेम उर्फ नेपाली शालीकराम खत्री या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. 

आता सत्येंद्र उर्फ राहुल राजबहाद्दुर गुप्ता आणि बिसेन सिंग उईके हे दोन फरार कैदी अजून पोलिसांच्या हाती सापडलेले नाहीत. गेल्या ३१ मार्च रोजी हे सगळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.