वेध निवडणुकीचे, कॉमन मॅन डोंबिवलीत पीटतोय दवंडी

 दवंडी पीटत आपलं म्हणणं जनतेसमोर मांडण्याची राजा महाराजांच्या काळातली पद्धत एका कॉमन मॅनने डोंबिवलीत अवलंबलीय. चांगला उमेदवार निवडून द्या अमिषाला बळी पडू नका, असं आवाहन दवंडीच्या माध्यमातून करत राजन मुकादम डोंबिवलीत फिरत आहेत. 

Updated: Sep 4, 2015, 05:33 PM IST
वेध निवडणुकीचे, कॉमन मॅन डोंबिवलीत पीटतोय दवंडी  title=

डोंबिवली : दवंडी पीटत आपलं म्हणणं जनतेसमोर मांडण्याची राजा महाराजांच्या काळातली पद्धत एका कॉमन मॅनने डोंबिवलीत अवलंबलीय. चांगला उमेदवार निवडून द्या अमिषाला बळी पडू नका, असं आवाहन दवंडीच्या माध्यमातून करत राजन मुकादम डोंबिवलीत फिरत आहेत. 

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे वारे वाहात आहेत. सर्व पक्षातले आजी माजी नगरसेवक, इच्छूक उमेदवार विविध कार्यक्रम, मोफत दाखले, वस्तू वाटप करत आहेत. 

या अमिषांना बळी न पडण्याचं आवाहन मुकादम करत आहेत. याआधी महापालिकेला आयएएस दर्जाचा आयुक्त मिळावा यासाठी मुकादम यांनी घंटानाद आंदोलन केलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.