किल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळाची स्थापना करा - संभाजीराजे

राज्यातील गड, किल्ले संवर्धन करण्यासाठी सरकारने महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 1, 2017, 11:00 PM IST
किल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळाची स्थापना करा - संभाजीराजे title=

कोल्हापूर : राज्यातील गड, किल्ले संवर्धन करण्यासाठी सरकारने महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण किल्ले रायगड. रायगडाच्या विकासासाठी राज्य सरकारने दिलेल्या 600 कोटी रुपयांच्या आराखड्याला केंद्र सरकारने तत्वतः मंजुरी दिली.

गडकोट किल्यांच्या विकासाचे अधिकार राज्य सरकारला मिळणं ही बाब ऐतिहासिक असल्याचं शिवाजी महाराजांचं वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त म्हटले आहे. 

रायगडाप्रमाणे राज्यातल्या अन्य किल्यांच्या संवर्धन सरकारने महामंडळाची स्थापना करावी, असं मतही संभाजीराजेंनी व्यक्त केलंय.