झी २४ तासच्या प्रतिनिधींना मारहाणीचा राज्यातून निषेध

झी 24 तासच्या प्रतिनीधी स्वाती नाईक आणि व्हिडीओ जर्नलिस्ट संदीप भारती यांच्यावर दिघ्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा समाजातील सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. 

Updated: Mar 1, 2017, 10:45 PM IST
 झी २४ तासच्या प्रतिनिधींना मारहाणीचा राज्यातून निषेध title=

मुंबई : झी 24 तासच्या प्रतिनीधी स्वाती नाईक आणि व्हिडीओ जर्नलिस्ट संदीप भारती यांच्यावर दिघ्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा समाजातील सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. 

राज्यभरातील पत्रकार संघांनी, विविध संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. रत्नागिरीतल्या पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवत आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली. अधिवेशनात सरकारनं पत्रकार संरक्षण कायद्याला मंजुरी द्यावी अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबनं केलीय. 

इंदापूर तालुका पत्रकारांकडूनही काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या गंभीर घटनेतील पत्रकारांच्या हल्लेखोरांवर त्वरित कारवाईचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. पत्रकार सरक्षंण कायदा तातडीनं मंजूर करावा अन्यथा पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारु अश्या संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. 

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून 16 ठिकाणांवरून मारहाण करणा-यांवर कठोर कारवाई करुन पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशा आशयाची निवेदनं जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलीयत. तर अहमदनगरमध्येही पत्रकार हल्ला विरोधी कायदा कृती समितीच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला.