पुणे : पत्नी माहेरी गेली म्हणून पतीने तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. यावेळी यात हस्तक्षेप करणाऱ्या मेहुण्यालाही मारहाण करण्यात आली.
राजेंद्र शिंदे असे आरोपी पतीचे नाव आहे. त्यांची पत्नी पूजा शिंदे ही माहेरी राहायला आली होती. ती माहेरी आल्याचा राजेंद्र शिंदे यांना राग आला. यामुळे राजेंद्र यांनी पूजा यांच्या माहेरी जात तेथे तिला मारहाण केली.
बहिणीला मारहाण होत असेलली पाहून पुजा यांच्या भावाने यात हस्तक्षेप केला. मात्र राजेंद्र यांनी त्यांनाही मारहाण केली.