मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंप दरम्यान ट्रकने क्रेनला मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. यामध्ये चालकासह २ जण जखमी झाले आहेत.

Updated: May 7, 2017, 12:43 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहतूक कोंडी title=

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंप दरम्यान ट्रकने क्रेनला मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. यामध्ये चालकासह २ जण जखमी झाले आहेत.

अपघातामुळे मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईच्या दिशेने एक क्रेन येत असताना मागून ट्रकने धडक दिली. ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.