www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय वातावरण काही अंशी थंड झालं असलं तरी राज्यात तपमानाचा पारा चांगलाच चढलाय. वैशाखाआधीच वणवा पेटलाय की काय? असं वातावरण सध्या पसरलंय.
कोकणातही आता वैशाख वणव्याची चाहुल लागण्यास सुरूवात झालीय. कोकणातील बहुतेक भागात तापमानाने `चाळीशी` ओलांडलीय. गेल्या काही दिवसांपासून उन पावसाचा खेळ अनुभवणाऱ्या कोकणवासीयांना गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचे चटके सोसावे लागतायत. उन्हाच्या झळांमुळे रस्ते ओस पडल्याचं चित्र पहायला मिळतंय तर ज्यूसच्या गाडीवर गर्दी पहायला मिळतेय. या उन्हाचा फटका येथील आंबा बागायतदारांना सोसावा लागतोय.
जळगाव जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच ४३ ते ४४ अशं सेल्सियस तापमान झाल्याने नागरिक हेराण झालेत. यामुळं जळगावातील प्रमुख रस्त्यांवर अघोषित संचारबंदीच असल्याचं चित्र आहे. उन्हाचा बचाव करण्यासाठी नागरिक सकाळीच काम करून घेत आहेत. जळगावातील उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. एप्रिल महिन्यातच मे हीटचा तडाखा नागरिकांना बसतोय.
राज्यातल्या विविध भागातल्या तापमानावर एक नजर टाकूया....
* मुंबई - 33.8 अंश से.
* पुणे - 39.6 अंश से.
* नाशिक - 38.7 अंश से.
* औरंगाबाद - 39.8 अंश से.
* नागपूर - 42.2 अंश से.
* यवतमाळ - 41.1 अंश से.
* चंद्रपूर - 44.4 अंश से.
* अकोला - 42.6 अंश से.
* सोलापूर - 41.3 अंश से.
* सातारा - 40.3 अंश से.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.