बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूरच्या तहसील कार्यालयातली ही दृष्य. तहानेनं व्याकूळ वानरसेना एका हातपंपाजवळ बसली होती. ही बाब पटवारी असलेल्या सिद्धेश्वर रंगदळ यांच्या निदर्शनास आली... त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाणी हापसण्यास सुरूवात केली.
वानरसेनेची तहान भागेपर्यंत सिद्धेश्वर रंगदळ यांनी हे काम केलं. सिद्धेश्वर रंगदळ शेतकरी कुटुंबातील आहेत...लहानपणापासूनच त्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा आहे. या घटनेनंही ते सिद्ध झालंय. अशा या प्राणीप्रेमीचं सगळीकडूनच खास कौतुक होतंय.