प्रियसीवर केला वार, नियतीनं घेतला बदला, ट्रकखाली ठार

जेव्हाचं तेव्हाच भोगावं लागतं ही म्हण एका तरुणाच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. आपल्या प्रेयसीवर शस्त्रानं वार करून पळणारा तरूण स्वत:च ट्रक खाली आला आणि त्याचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दहिसर पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली. अनिल दांडेकर (२३) असं मृताचं नाव आहे.

Updated: Jan 7, 2015, 01:07 PM IST
प्रियसीवर केला वार, नियतीनं घेतला बदला, ट्रकखाली ठार title=

मुंबई : जेव्हाचं तेव्हाच भोगावं लागतं ही म्हण एका तरुणाच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. आपल्या प्रेयसीवर शस्त्रानं वार करून पळणारा तरूण स्वत:च ट्रक खाली आला आणि त्याचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दहिसर पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली. अनिल दांडेकर (२३) असं मृताचं नाव आहे.

दहिसर पूर्व, काजूपाडा इथल्या हनुमान टेकडी परिसरात अनिल दांडेकर राहत असून, तो रिक्षाचालक होता. त्याचं याच परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोमवारी संध्याकाळी शिकवणीला जात असताना तिच्याशी लग्न करण्याच्या निश्चयानं त्यानं तिला रिक्षातून घेऊन पलायन केलं. संध्याकाळी ९ च्या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि अनिलनं रिक्षा दहिसर पश्चिम द्रुतगती महामार्गावर थांबवली. धारधार शस्त्रानं अनिलनं तिच्या गळ्यावर सात ते आठ वार केले. वार करून रक्तबंबाळ झालेल्या त्या मुलीला रिक्षात सोडून तो पळून जाण्याच्या बेतात होता. त्यावेळी समोरून आलेल्या ट्रकनं त्याला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. मुलीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केलं. मुलीकडे असलेल्या शिकवणीच्या बॅगेवरील फोन नंबरवरून पोलिसांनी शिकवणीमध्ये माहिती दिली.  

दरम्यान, मुलीचा जीव वाचला असून तिच्यावर दहिसर इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मृत अनिल विरोधात ३०७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि अनिलला उडवणाऱ्या फरार ट्रकचालकाचा दहिसर पोलीस शोध घेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.