मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक जुन्या हायवेवरून वळवली

मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईकडे येणारा कंटेनर आणि क्रेनचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. 

Updated: Jan 7, 2015, 11:36 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक जुन्या हायवेवरून वळवली title=

पुणे: मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईकडे येणारा कंटेनर आणि क्रेनचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. 

अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामुळं वाहतूक जुन्या मुंबई-पुणे हायवेवरून वळवण्यात आली आहे. 

सततचे होणारे अपघात आणि प्रवासास होणाऱ्या विलंबामुळे जुन्या मुंबई-पुणे हायवेसह एक्स्प्रेसवेचं रुंदीकरण कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

एक्स्प्रेस-वेचं रूंदीकरण कधी ?
- जुना हायवे, एक्स्प्रेस वे वेगळा करण्याचा MSRDCचा प्लान 3 वर्षांपूर्वी तयार
- 4 लेनचा जुना मुंबई-पुणे हायवे 6 लेनचा करण्याचा प्रस्ताव
- 6 लेनचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 8 लेनचा करण्याचा प्रस्ताव
- 9ते10 किमी लांबीचा बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव
- प्रकल्पाचे काम सुरू झाल्यास 5 वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.