पुणे : गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी लढणारा हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीचे समर्थन केलं आहे. आरक्षण मिळवण्यासाठी सगळयांनी एकत्र आलं पाहिजे. असं हार्दिक पटेलने म्हटलं आहे.
पुण्यातील 'एमआयटी' संस्थेत आयोजित एका कार्यक्रमात हार्दिक पटेल बोलत होता. पाटीदार आंदोलनादरम्यान देशद्रोहाच्या आरोपाखाली हार्दिक पटेलला अटक देखील झाली होती. सहा महिन्यांसाठी गुजरातबाहेर जाण्याच्या अटीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. या सहा महिन्यांदरम्यान हार्दिक पटेल राजस्थानमध्ये राहत होता.
भविष्यात आरक्षणासाठी पुन्हा लढा उभा करणार असल्याचं हार्दिकने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत त्यांनी मोदींवर आणि भाजपवर टीका केली.