ओरोस : सिंधुदुर्गातील पर्यटन व्यावसायिकांना जबरदस्त दणका बसलाय. सिंधुदुर्गातील तारकर्लीतील अनधिकृत बांधकामं शुक्रवारी प्रशासनाने पाडलीत.
तारकर्लीत अनेकांनी पैशाच्या जीवावर सागरी अधिनियम धाब्यावर बसवत अनधिकृत बांधकामं केली आहेत. काहींनी तर बंधाऱ्यावरच बांधकामं केली आहेत. तहसीलदार वनीता पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. यावेळी ही कारवाई रोखण्याचा स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केला मात्र कायदेशीर कारवाई होणारच, असे सांगत दुपारी बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
पहिल्या टप्प्यात नवीन बांधकामं हटविण्यात आली आहेत. पुढच्या टप्प्यात हॉटेलवरही कारवाई होणार असल्याचे संकेत प्रांताधिका-यांनी दिले आहेत. दरम्यान. या करवाईमुळे व्यावसायिक चांगलेच धास्तावले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.